RPF on action mode in Bhusawal: Action taken against 933 illegal food vendors in a single month भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : प्रवाशांच्या आरोग्या प्रती जागरुक राहत रल्वे सुरक्षा बलाने अवैध खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध मोहिम राबवत सप्टेंबरमध्ये तब्बल 933 अवैध विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. या कारवाईने अवैध विक्रेत्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे.

भुसावळ रेल्वे स्थानकासह विभागातील विविध प्रमुख स्थानकांवर रेल्वे सुरक्षा सुरक्षा बलाने दिवाळीच्या काळात प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन ही मोहीम अधिक गतीमान केल्याचे रेल्वे सुरक्षा बलाचे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांनी सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकांवर अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विकणार्या विक्रेत्यांची संख्या वाढत होती. हे विक्रेते स्वच्छतेच्या निकषांचे पालन करत नसल्याने प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत होता.यामुळे रेल्वे सुरक्षा बलाने विभागीय स्तरावर विशेष लक्ष केंद्रीत करून सततच्या कारवायांद्वारे अवैध विक्रेत्यांवर अंकुश ठेवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. आरपीएफच्या रडावर आता अवैध विक्रेते आहे. तसेच धावत्या गाडीत सुध्दा अवैध विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे आदेश आयुक्त जोशी यांनी दिले आहे.
सप्टेंबर महिन्यात करण्यात आलेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रवाशांना दर्जेदार,अधिकृत खाद्यपदार्थच उपलब्ध व्हावेत यासाठी रेल्वे प्रशासन कटिबद्ध आहे.प्रवाशांनीही प्रवासादरम्यान अधिकृत परवाना धारक स्टॉल्समधूनच खाद्यपदार्थ खरेदी करावेत, असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे. भुसावळ स्थानकावर आरपीएफ निरीक्षक पी.आर. मीना यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली जात आहे.