दुर्गा विसर्जनासाठी 12 वाजेपर्यंत वाद्याला परवानगी

Musical instruments allowed till 12 noon for Durga Visarjan भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : दुर्गा देवी विसर्जनासाठी भाविक सज्ज झाले असून आज रात्री विसर्जन मिरवणुकीत 12 वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास जिल्हाधिकरारी आयुष प्रसाद यांनी परवानगी दिली आहे. दरम्यान, शहरातील 188 सार्वजनिक दुर्गा मंडळांतर्फे शुक्रवारी दुर्गामातेला निरोप देण्याची तयारी सुरू झाली असून मुख्य मिरवणुकीत 52 मंडळे आपला सहभाग नोंदवतील.

प्रत्येक वाहनांना मिळणार क्रमांक
भुसावळात विसर्जन मिरवणुकीतील देवीच्या विसर्जन वाहनांना पोलिस प्रशासनाकडून क्रमांक वितरीत केले जातील. काही मंडळांकडून मूर्ती थेट वाघूर धरणावर विसर्जनासाठी नेल्या जाणार आहेत. मंडळांनी लवकर मिरवणुकीला सुरूवात करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

प्रशासनाकडून तयारी पूर्ण
विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिका व पोलिस प्रशासनाने तयारी पूर्ण केली आहे.यंदा संपूर्ण मिरवणूक मार्गावर ड्रोन कॅमेर्‍यांसह सीसीटीव्हीची नजर ठेवली जाणार आहे. सराफ बाजार, मरीमाता मंदिर परिसर,गांधी पुतळा, यावल नाका आदी भागात फोकस कॅमेरे लावले जात आहेत.तसेच पोलिसांकडून मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरणही होईल. शहरातील बसस्थानक दुपारी एक वाजेनंतर वरणगाव रोडवरील पंधरा बंगला भागातील एसटी डेपोत स्थलांतरित होईल

मुख्य मिरवणूक मार्गावर नृसिंह मंदिर ते स्टेशन रोडवरील अमर स्टोअर्सपर्यतच्या मार्गाला जोडले जाणारे 14 उपरस्ते शुक्रवारी बॅरेकेट लावून बंद होतील.