माहेश्वरी समाजातर्फे महेश स्तंभाचे भूमिपूजन

Maheshwari community performs foundation stone puja for Mahesh pillar at Bazarpet Chowk in Bhusawal भुसावळ (3 ऑक्टोबर 2025) : शहरातील माहेश्वरी समाजाद्वारे दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर शहरातील बाजारपेठ पोलिस ठाण्यासमोरील चौकात सुशोभीकरणासाठी भव्य महेश स्तंभाच्या पायाभरणीसाठी भूमिपूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्याहस्ते करण्यात आले. बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ हे प्रमुख अतिथी होते.
यावेळी माहेश्वरी समाजातील सर्व पुरुष व महिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पामुळे शहराचे सौंदर्य वाढेल,असा विश्वास सगळ्या उपस्थितांनी व्यक्त केल्याचे भुसावळ माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष संजय लाहोटी कळवतात.