Durgotsav immersion with great enthusiasm by 67 mandals in eight villages including Yaval city यावल (4 ऑक्टोबर 2025) : शहर व यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध 9 गावांमध्ये सार्वजनिक व खाजगी अशा 67 दुर्गोत्सव मंडळांनी शुक्रवारी शांततापूर्वक विसर्जन केले.

दुपारनंतर निघाली विसर्जन मिरवणूक
दुपारनंतर विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. वाजंत्रीकरिता रात्री 12 वाजेची वेळ असलीतरी ही वेळ मर्यादा सर्वच मंडळांनी पाळली आणि मोठ्या शांततेत आणि उत्साहात दुर्गोत्सव विसर्जन मिरवणूक झाली. सर्वच ठिकाणी यावल पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्तदेखील ठेवण्यात आला. उर्वरित काही गावांमध्ये आता शनिवारी व रविवारी विसर्जन केले जाणार आहे.
यावलला 43 मंडळांतर्फे दुर्गा विसर्जन
यावल शहरात सार्वजनिक व खाजगी 43 दुर्गोत्सव मंडळाकडून शुक्रवारी भव्य अशी मिरवणुक काढण्यात आली या विसर्जन मिरवणुकीस पाहण्या करीता मोठ्या संख्येत शहरासह तालुक्यातुन भाविक,भक्तांनी शहरात उपस्थिती दिली.
यावल पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विविध आठ गावांमध्ये नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला व शुक्रवारी विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. शहरासह ग्रामीण भागातील 67 दुर्गात्सव मंडळाकडून आई दुर्गेस निरोप देण्यात आला. वाजंत्री करिता सर्वाच्च न्यायालयाने रात्री 12 वाजेची वेळ मर्यादा निश्चित केली होती. या निर्धारित वेळेत यावल शहर सह सर्व गावातील दुर्गोत्सव मंडळांनी मोठ्या उत्साहात आणि शांततेत आई दुर्गेला निरोप दिला.
यावल पोलिसांचा चोख बंदोबस्त
यावल शहरात शांतता समितीच्या सदस्यांनी मशिदीजवळ थांबून विसर्जन मिरवणुकीचे स्वागत केले. विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी फैजपूर उपविभागीय पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर, यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
यावल शहरात 43 तर किनगाव 09, चितोडा 04, नायगाव 05, कोरपावली 01, चिंचोली 01, बोरावल खुर्द 01, सावखेडासिम 02, पांढरी वस्ती मोहराळे 01 अशा गाव निहाय मंडळाकडून शांततेत विर्सजन पार पडले.