साईनगर शिर्डी-कालका एक्स्प्रेसला अतिरिक्त एसी डबा

Sainagar Shirdi-Kalka Express to get an additional AC coach भुसावळ (4 ऑक्टोबर 2025) : रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकाधिक सुविधा देण्याच्या दृष्टीने साईनगर शिर्डी ते कालका एक्सप्रेसला (गाडी क्रमांक 22455 व 22456) एक अतिरिक्त वातानुकूलित-तृतीय श्रेणीचा (थर्ड एसी) डब्बा कायमस्वरूपी जोडण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांची सोय होणार आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा
साईनगर शिर्डी-कालका एक्सप्रेसला शिर्डीपासून 4 ऑक्टोबरपासून तर कालकापासून 2 ऑक्टोबरपासून हा डबा जोडला जोडण्यात आला आहे. यामुळे गाडीच्या सुधारित संरचनेत आता बदल झाला आहे. आता एक वातानुकूलित-द्वितीय, तीन वातानुकूलित-तृतीय, पाच शयनयान, पाच जनरल सेकंड क्लाससह दोन लगेज कम गार्डचे ब्रेक व्हॅन असे एकूण गाडीच्या संरचनेत आता 16 डब्बे असतील, ज्यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायक आणि सुलभ प्रवासाचा अनुभव मिळेल.