The board of directors has become a symbol of progress: Guardian Minister Gulabrao Patil जळगाव (4 ऑक्टोंबर 2025) : संचालक मंडळाच्या मनात आलं तर बाजार समितीची नक्की प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. शेतकर्याच्या रक्त मांसातून उभी राहिलेली ही संस्था अधिक बळकट व्हायला हवी असे प्रतिपादन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याहस्ते बाजार समितीच्या आवारात झाले त्यावेळी ते बोलत होते.

4.50 रुपयांच्या कामांचे भूमिपूजन
विकासकामांत मुख्य मार्केट यार्डमधील शॉपिंग व हॉल बांधकाम, गलंगी येथे गोडाऊन भूमिपूजन, बाजार समितीच्या गोडाऊन मागील भिंत दुरुस्ती, शेतकरी निवासाच्या मागे वॉल कंपाऊंड बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले आणि एका नवीन जेसीबी मशिनचे लोकार्पण करण्यात आले असून एकूण 4.50 कोटी रुपयांचा निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यात आले.
आता दररोज होणार लिलाव : आमदार सोनवणे
आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे आपल्या मनोगतात म्हणाले की, मागील काळात पंधरा-पंधरा दिवस लिलाव होत नव्हते. मात्र आता दररोज लिलाव होत असून शेतकर्यांना लगेच पेमेंट मिळते. संचालक मंडळाने कोट्यवधी रुपयांची उलाढाल वाढवली आहे. नव्या जेसीबी मशिनमुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार आहे.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास माजी आमदार लता सोनवणे, जिल्हा बँकेचे संचालक घनश्याम अग्रवाल, दूध संघाचे संचालक रोहित निकम, सभापती नरेंद्र पाटील, उपसभापती विनायकराव चव्हाण, रावसाहेब पाटील (संचालक), गोपाल पाटील, शिवराज पाटील, विजय पाटील, सुनिल जैन, किरण देवराज, मनोज सनेर, नंदकिशोर सांगोरे, सौ. कल्पनाताई पाटील, सुनिल अग्रवाल, सूर्यभान पाटील नितीन पाटील, रोहिदास सोनवणे (सचिव), जितेंद्र देशमुख (उपसचिव), चंद्रशेखर पाटील, राजेंद्र पाटील, नामदेव पाटील, विकास पाटील, प्रताप अण्णा पाटील, कांतीलाल पाटील सर, पिंटू पावरा, सौ. आनिताताई शिरसाठ, सौ. संध्याताई महाजन, सौ. शीतलताई देवराज, ए.के. गंभीर सर, राकेश पाटील, रविंद्र सोनवणे, गोपल चौधरी, सौ. सुरेखा कोळी, सौ. मनीषा पाटील, गिरीश देशमुख आणि नवलसिंह राजे पाटील यांच्यासह संचालक मंडळ, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील, रोहित निकम व अॅड.शिवराज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार आर.एस.पाटील यांनी मानले.