चोरटे सैराट : विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र फोडले

State Electricity Distribution Company’s electricity poles were broken and copper plates were stretched: Farmers in Yaval taluka are in trouble यावल (5 ऑक्टोबर 2025) : यावल तालुक्यातील वढोदा गावाच्या शेत शिवारात नावरे रस्त्यावरील राज्य विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र अज्ञात चोरट्याने फोडून त्यातील कॉपर प्लेट चोरी लांबवल्या. रोहित्रातील प्लेट चोरी गेल्याने या भागातील शेतातील वीजपुरवठा खंडीत झाल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहे.

काय घडले नेमके ?
वढोदा, ता.यावल येथील शेत-शिवारात नावरे रस्त्यावर विद्युत वितरण कंपनीचे रोहित्र क्रमांक 17 आहे. मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने रोहित्र फोडून त्यातील कॉपरच्या प्लेेट चोरी केल्या. रोहित्रातील सुमारे 150 लिटर ऑईल फेकून नुकसान केले. हा प्रकार निर्दशनास आल्यानंतर घटनास्थळी वरिष्ठ तंत्रज्ञ रुपेश भारुडे, वरिष्ठ तंत्रज्ञ किरण बागुल, तंत्रज्ञ व्यंकटेश बारी यांनी पाहणी केली. याबाबत यावल पोलिसात तक्रार देण्यात आली.