Audacious house burglary in Chameli Nagar, Bhusawal: Property worth five and a half lakhs looted भुसावळ (5 ऑक्टोबर 2025) : शहरात चोर्या-घरफोड्यांचे कायम असून शहर पोलिस ठाणे हद्दीतील चमेली नगरातील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ धाडसी घरफोडी झाल्याने या परिसरातील रहिवासी धास्तावले आहेत. बाजारपेठ पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्री घरफोडीने खळबळ
अंबिका सॉ मिलचे संचालक सचिन अनिल चौधरी (चमेली नगर, भुसावळ) यांच्या घरात 3 ऑक्टोबरच्या रात्री 10 ते 4 ऑक्टोबरच्या पहाटे 2 वाजेपर्यंतच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या गेटवरून उडी मारूत चोरट्यांनी घरात प्रवेश केला.
या ऐवजावर चोरट्यांचा डल्ला
चोरट्यांनी घरातील तीन लाख 30 हजारांची रोकड, एक लाख 60 हजार रुपये किंमतीची पोत, 12 हजार रुपये किंमतीचे कानातले, 12 हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत, आठ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे डोरले, पाच हजार रुपये किंमतीचे चांदीचे ब्रासलेट, पाच हजार रुपये किंमतीचे चांदीचे पैजण मिळून पाच लाख 32 हजारांचा ऐवज लांबवला.
घरफोडीची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. तपास पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत, बाजारपेठ निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव करीत आहे.