संशयित मोबाईल चोरटा आरपीएफच्या जाळ्यात

Mobile thief in Bhusawal handcuffed by security forces भुसावळ (5 ऑक्टोबर 2025) : रेल्वे सुरक्षा बलाच्या ऑपरेशन यात्री सुरक्षा अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफच्या पथकाने मोबाईल चोरीत सामील असलेल्या एका संशयीताला रंगेहाथ पकडून लोहमार्ग पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. नूरा उर्फ बचकांडा अजगर कादर शेख (32, रा.गौसिया नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

संशय आल्याने आरोपी जाळ्यात
बुधवारख, 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता भुसावळ स्थानकाच्या दक्षिणेकडील पार्किंग परिसरात गस्त घालत असताना आरपीएफ महेंद्र कुशवाहा, इमरान खान आणि पोलीस बाबू मिर्झा यांच्या पथकाला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरताना आढळला.त्याला विचारपूस करताना समाधानकारक उत्तर न दिल्याने त्याला आरपीएफ ठाण्यात आणण्यात आले.त्याने आपले नाव नूरा उर्फ बचकांडा अजगर कादर शेख (वय 32, रा. गोसिया नगर, भुसावळ) असे सांगितले.

दोन पंचासमक्ष त्याची तपासणी केली असता, त्याच्याकडे एक हजार 999 रुपये किंमतीचा स्काय ब्ल्यू रंगाचा मोबाईल मिळाला. चौकशीअंती त्याने 23 सप्टेंबर रोजी सेवाग्राम एक्सप्रेसच्या (12139) जनरल डब्यात गर्दीचा फायदा घेत प्रवाशाच्या खिशातून मोबाईल चोरल्याची कबुली दिली. यावेळी आरपीएफ यांनी त्याला लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. जीआरपीला संशयीत आधीच दाखल असलेल्या गुन्ह्यात वॉण्टेड असल्याचे सांगण्यात आले.