माहिजी येथे तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या जोडणीमुळे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

भुसावळ प्रतिनिधी l भुसावळ रेल्वे विभागातील जळगाव-मनमाड
मार्गावर माहेजी स्थानकाजवळ तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या जोडणीसाठी यार्ड रीमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या अनुषंगाने १२ जून २०२५ रोजी नॉन इंटरलॉकिंग कार्य करण्यात येणार असून, त्यामुळे काही रेल्वेगाड्यांच्या सेवा प्रभावित होणार आहेत.
यामध्ये दोन गाड्या पूर्णतः रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द होणाऱ्या गाड्या मध्ये ११११९ इगतपुरी-भुसावळ मेमू, १११२०
आज भुसावळ-इगतपुरी, इगतपुरी- भुसावळ मेमू रद्द
भुसावळ-इगतपुरी मेमू यांचा समावेश आहे.
तर काही गाड्या मार्गात थांबवून ठेवण्यात (रेग्युलेट) येणार आहेत. यात १२७४१ वास्को-दी-गामा-पटना एक्सप्रेस १ तास ३० मिनिटे, १२१७१ एलटीटी-हरिद्वार एक्सप्रेस ४५ मिनिटे, ०५५५८ एलटीटी-रक्सौल एक्सप्रेस ४५ मिनिटे, काही गाड्यांचे प्रस्थान वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यामध्ये १२१६५ एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस सकाळी
७.४५ (मूळ वेळः ६,००), १५०१७एलटीटी-गोरखपुर एक्सप्रेस सकाळी ७.३५ (मूळ वेळ ६.३५) या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.