पारोळ्यात कैऱ्यांसाठी झुंबड ; महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली

पारोळ्यात कैऱ्यांसाठी झुंबड ; महामार्गावर वाहतूक व्यवस्था कोलमडली

पारोळा —प्रतिनिधी पारोळा येथे रविवार हा बाजाराचा दिवस असतो त्यात सद्या घरोघरी लोणचे टाकण्याची गर्दी सुरु असल्याने नागरिकांनी बाजार समितीत कैऱ्या घेण्यासाठी
एकच गर्दी केल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती सकाळी आठ पासुनच बाजार समितीच्या आवारात शेतकऱ्यांनी आपली वाहने थेट बाजार समितीत उभी केली त्यात नागरिकांनी आपली लहान मोठी वाहने देखील मुख्य प्रवेश द्वारात आणल्याने पायी चालणे देखील अवघड झाले होते. कैरी बाजार सह अनेक व्यापाऱ्यांनी लोणच्यासाठी लागणाऱ्या मसाले ची दुकानें थाटली होती. यासाह खाद्य पदार्थ, चहा हॉटेल ही उघड्यावर सुरु असल्याने गर्दीला उधाण आले होते. बाजार समितीत गुरांचा बाजार ही भरत असतो त्या मुळे दिनांक १५ जुन रोजी गर्दीचा उच्चांक दिसून आला. पारोळा बाजार समिती ही राष्ट्रीय महामार्ग लागून असल्याने या मार्गावर जळगाव, धुळे, अमळनेर कडे जाणाऱ्या वाहना ची मोठी गर्दी झाली होती
तसेच कैरी घेणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने अस्त वेस्त लावल्याने जवळपास एक ते दीड तास नागरिकांसह वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे संपूर्ण वाहतूक ठप्प पडलेली असताना हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनचे कर्मचारी व वाहतूक पोलीस मात्र बघ्याची भूमिका घेत होते तब्बल दीड तासा नंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली. बाजार समितीने शेतकरी व व्यापारी वर्गासाठी वेगळा पार्किंग झोन करावा तसेच वाहतूक सुरळीत केली हे दरवर्षी उद्भवणारी समस्या असुन यावर बाजार समितीने काही ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे.