हातले येथे विजेच्या धक्क्याने तरुणीचा मृत्यू

चाळीसगाव, (प्रतिनिधी):
तालुक्यातील हातले तांडा येथे विजेचा धक्का बसून १७ वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी सुमारे ९.४५ वाजता घडली.
धनश्री साईनाथ राठोड (वय १७) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती घरात काम करत असताना विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसला आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास सुरू आहे.