ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली; ११ प्रवासी जखमी

चोपडा-अमळनेर रस्त्यावरील घटना
चोपडा(प्रतिनिधी):
यावल येथून सुरतकडे निघालेली माऊली ट्रॅव्हल्स (जीजे-१४ डब्ल्यू-०५०२) ही खासगी बस चोपडा-अमळनेर रस्त्यावरील पंकज ग्लोबलजवळ अपघातग्रस्त झाली. २५ जून रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता झालेल्या या अपघातात ११ प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, चारचाकी वाहनाला ओव्हरटेक करताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमध्ये प्रवास करणाऱ्या जखमींमध्ये खालील प्रवाशांचा समावेश आहे:
जखमींमध्ये अमळनेर तालुक्यातील डांगर येथील अमोल प्रकाश सोनवणे (वय २४), तालुक्यातील अडावद
येथील उषाबाई शांताराम पाटील (वय ६६) व शांताराम रामदास पाटील (वय ७५), चोपडा येथील मेहरून निसा शेख मेहबूब (वय १२), फातिमा बी इंद्रिस शेख, रुखसानाबी शेख मेहमूब (वय ४०) व मुस्तकीन शेख मेहबूब (वय ११), धानोरा येथील अलफिया शेख इंद्रिस (वय ३ महिने), नाझिया परविन शेख इंद्रिस (वय ९). सूरत येथील विजय भालचंद्र पाटील (वय ३८), तरन्नुम शेख मेहबूब (वय १८) हे जखमी झाले आहे. सर्व जखमींवर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ. सुरेश पाटील, डॉ. स्वप्ना पाटील, डॉ. सागर पाटील यांनी उपचार केले. तर घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.