नागरी सहकारी बँकांच्या विश्वासार्हतेत वर्धमान बँकेचे योगदान – मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, २८ जून २०२५ प्रतिनिधी l
राज्यातील नागरी सहकारी बँकांनी बँकिंग व्यवहाराबाबत जनतेमध्ये विश्वास निर्माण केला असून, या बँकांचे राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
वर्धमान अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या रौप्य महोत्सवप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, माजी खासदार अजय संचेती, माजी आमदार सागर मेघे आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी वर्धमान बँकेच्या कार्याची प्रशंसा करत सांगितले की,
बँकेचा एनपीए शून्य असून, सातत्याने १५% लाभांश दिला जातो.
प्राधान्य क्षेत्रात कर्जपुरवठ्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळाली.
सामाजिक कार्यातही बँकेचा मोलाचा वाटा आहे.
फडणवीस यांनी बँकेच्या स्थापनेच्या (१९९९) आठवणी जागवत सांगितले की, त्याच वर्षी ते विधानसभेत निवडून आले. बँकेच्या संचालक मंडळाच्या व्यावसायिक निर्णयक्षमतेमुळेच “वर्धमान” हे नाव सार्थक ठरल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्र्यांनी वर्धमान बँकेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.