दहावीच्या विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हा, जिल्हा परिषदेचा धडाकेबाज निर्णय

दहावीच्या विद्यार्थ्यांचे दाखले रोखणाऱ्या मुख्याध्यापकावर गुन्हा, जिल्हा परिषदेचा धडाकेबाज निर्णय

जळगाव (प्रतिनिधी), २८ जून :
नशिराबाद येथील के.एस.टी. उर्दू शाळेतील ८० दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचे दाखले न दिल्याने, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळावे म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने कारवाई केली.

मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या निर्देशानुसार, गटशिक्षणाधिकारी सरला पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक शाळेत दाखल झाले. मात्र प्रभारी मुख्याध्यापक वसीम अक्रम शेख मुसा यांनी शाळेला कुलूप लावून प्रशासनाला प्रवेश नाकारला. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणल्याच्या कारणावरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस संरक्षणात शाळेचे कुलूप तोडून गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापक पदाचा चार्ज स्वीकारला व विद्यार्थ्यांना दाखले वाटप केले.

जिल्हा परिषदेच्या तत्पर व संवेदनशील भूमिकेमुळे ८० विद्यार्थ्यांचे भवितव्य वाचले. ही कारवाई समाजासाठी अनुकरणीय उदाहरण ठरली आहे.