वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे विश्वचि माझे घर,” या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशातून झाडे लावण्याचे महत्व समजते, त्यासाठी वेगळे काही सांगण्याची गरज नाही. – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

वृक्षवल्ली आम्हा सोयरे, हे विश्वचि माझे घर,” या संत तुकाराम महाराजांच्या उपदेशातून झाडे लावण्याचे महत्व समजते, त्यासाठी वेगळे काही सांगण्याची गरज नाही. – केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

जळगावमध्ये ‘एक पेड माँ के नाम 2.0’ मोहिमेअंतर्गत २ हजारांहून अधिक वृक्षारोपण; मातृत्वाला आदरांजली

जळगाव, दि. ५ जुलै २०२५ :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड माँ के नाम” या संकल्पनेला पुढे नेत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षा निखिल खडसे यांच्या नेतृत्वात आणि वस्त्रोद्योग मंत्री श्री. संजय सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत भुसावळ येथे “एक पेड माँ के नाम 2.0” ही भव्य वृक्षारोपण मोहीम यशस्वीरित्या राबवण्यात आली.

या वेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, श्रीमती संगीता बियानी, डॉ. सचिन नांद्रे, जिल्हा युवा अधिकारी अशोक कुमार (जळगाव) व भूषण पाटील (नंदुरबार), गट विकास अधिकारी सचिन पांझडे, लेखा सहाय्यक सुनील पंजे, सहायक प्रकल्प अधिकारी संदीप मोरे, तसेच चोरवड ग्रामपंचायतीचे सरपंच भैया महाजन, ग्रामसेवक राहुल पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, जिल्हा प्रशासन आणि ‘मेरा युवा भारत’ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवली गेली. मातृत्वाचा सन्मान आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत, या मोहिमेद्वारे “एक पेड माँ के नाम” लावण्याचे भावनिक आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी व स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत २ हजारांहून अधिक रोपे लावली. यामध्ये कडू बदाम, कडुलिंब, चिंच, आवळा, शिसम आदी झाडांचा समावेश होता, जे स्थानिक पर्यावरणाला पोषक ठरणारे आहेत.

याप्रसंगी मंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, “झाडे लावणे म्हणजे केवळ पर्यावरण रक्षण नव्हे, तर आईच्या मायेचा सन्मान आहे. संत तुकाराम महाराजांनी सांगितल्याप्रमाणे, ही सृष्टीच आपले कुटुंब आहे. झाडे लावा, झाडे वाचवा आणि मानवाचे जीवन समृद्ध करा.”

जळगाव जिल्ह्यातील वनक्षेत्र कमी असल्यामुळे भूजल पातळी घटणे, मातीची धूप, आणि तापमानवाढ यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. वाढते शहरीकरण याला आणखी बळ देत आहे. त्यामुळे “एक पेड माँ के नाम” सारख्या मोहिमांमुळे हरित क्षेत्र वाढून पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत मिळणार आहे.

या उपक्रमात पी. ओ. नाहटा महाविद्यालय, पी. के. कोटेचा महिला महाविद्यालय, चैतन्य आयुर्वेद महाविद्यालय, दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, गोदावरी नर्सिंग कॉलेज, आयटीआय भुसावळ, बियानी मिलिट्री स्कूल, राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय आदी महाविद्यालये आणि शाळांच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची आपली जबाबदारी समजून घेतली असून, भविष्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या सांगतेसह ‘निसर्गाचे रक्षण म्हणजेच आपल्या भविष्याचे रक्षण’ हा संदेश देत वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला.

अधिक माहितीसाठी संपर्क:
श्री. माधव वणवे, विशेष कार्यकारी अधिकारी,
युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, राज्यमंत्री कार्यालय
📞 +91 95958 78585 | ✉️ madhav.wanave@gov.in