पंढरपूर वारीतील अपूर्व जनसेवेचा जागतिक मानांकनास पात्र ठरणारा ठसा!
मंत्री गिरीशभाऊ महाजन यांची ५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते ६ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंत केली अखंड सेवा!
पंढरपूर पप्रतिनिधीl

महाराष्ट्राच्या जनसेवेचा नवा अध्याय आज पंढरपूरच्या पावन भूमीत लिहिला गेला. राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री मा. ना. गिरीशभाऊ महाजन यांनी ५ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते ६ जुलैच्या सायंकाळी ५ वाजेपर्यंत, तब्बल १७ तास न थांबता, न थकता, न खंडता सेवा देत वारकऱ्यांप्रती आपल्या निस्वार्थ निष्ठेचे अनोखे उदाहरण सादर केले.
विठुरायाच्या महापूजेनंतर पंढरपूरच्या महाद्वार परिसरात वाढलेल्या अफाट गर्दीचे व्यवस्थापन हे मोठे आव्हान होते. या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी सकाळी साडेपाच वाजता गिरीशभाऊ महाद्वार परिसरातील देखरेख टॉवरवर चढले आणि सायंकाळी पाच वाजेपर्यंत तिथेच कार्यरत राहून क्राउड मॅनेजमेंटचे संचालन करत राहिले.
यावेळी न थांबता वारकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणं, वॉकी-टॉकीच्या साहाय्याने पोलिस व आपत्कालीन यंत्रणांशी समन्वय साधणं आणि गरज असल्यास स्वतः मैदानात उतरून मदत करणं, हे सारे काम त्यांनी अतिशय सहजतेने आणि समर्पणाने पार पाडलं.
ऊन्हापावसाची पर्वा न करता, ना विश्रांती, ना आराम – फक्त विठोबाच्या भक्तांसाठी अखंड सेवा!
ही वृत्ती मंत्री नव्हे, तर खऱ्या सेवकाची असल्याचं दर्शन घडवत होती.
वारकरी, पोलीस, स्वयंसेवक व अधिकारी वर्गानेही गिरीशभाऊंच्या या योगदानाला भरभरून दाद दिली. अनेकांनी टॉवरकडे पाहून हात जोडले, वंदन केलं आणि भावनाविवश झाले.
गिरीशभाऊ महाजन म्हणजे केवळ मंत्री नाहीत, ते स्वतःच एक प्रेरणा आहेत!
पांडुरंगाच्या पावन वारीत त्यांनी दाखवलेली निःस्वार्थ सेवा ही नव्या पिढीसाठी दिशादर्शक ठरेल!