चोपडा येथे पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल आणि विवेकानंद विद्यालय येथे  वाहतूक समितीची बैठक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

चोपडा येथे पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल आणि विवेकानंद विद्यालय येथे  वाहतूक समितीची बैठक, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय

चोपडा (प्रतिनिधी) : चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल आणि विवेकानंद विद्यालय येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी वाहतूक समितीची बैठक नुकतीच पार पडली. ७ जुलै २०२५ रोजी झालेल्या या बैठकीमध्ये पालक, शालेय संचालक,शिक्षक व स्थानिक प्राधिकरण प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

बैठकीत विद्यार्थ्यांच्या बस वाहतुकीशी संबंधित विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. बस चालक व वाहक यांच्याकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेणे, बसची वेळेवर तपासणी करणे, गाड्यांचे पीयूसी व विमा वेळेवर करणे, तसेच वाहन परवान्याची व स्कूल बस असल्याचे बोर्ड लावणे, अशी उपाययोजना तातडीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, बसमध्ये शिस्त आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे निर्देश देण्यात आले. विद्यार्थ्यांच्या पालकांनीही वाहनचालकांशी नियमित संवाद साधावा, तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

बैठकीला सहाय्यक  मोटार वाहन निरीक्षक  सुयोग माने, यांच्यासह स्कूल बस चालक, शाळेचे संस्थापक अध्यक्ष सदस्य आणि शिक्षक, पालक ,   उपस्थित होते. प्राचार्यांनी सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आणि यापुढील काळातही अशा बैठका घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत सातत्याने उपाययोजना केल्या जातील, असे सांगितले.

ही बैठक विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत सकारात्मक ठरली असून, वाहन चालक व शाळा प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून देण्यात आली आहे.