जळगाव – प्रतिनिधी | अॅड. बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान व भवरलाल-कांताबाई जैन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ३४ वर्षांपासून सुरू असलेल्या मोफत वह्या व लेखन साहित्य वाटप उपक्रमाचे आयोजन यंदाही मोठ्या उत्साहात पार पडले.

या उपक्रमाचे आयोजन श्याम कोगटा आणि माजी नगरसेवक मनोज चौधरी यांनी केले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री सुरेशदादा जैन, खासदार स्मिताताई वाघ, आमदार राजू भोळे, अशोक जैन (कांताबाई फाउंडेशन), विजयकुमार वाणी, व शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे उपस्थित होते.
कार्यक्रमात गुणवंत आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक वह्या, पेन, पेन्सिल यांसारख्या लेखन साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवासात आर्थिक मदतीचा आधार मिळत असून, समाजासाठी हे अत्यंत प्रेरणादायी कार्य ठरत आहे.
उपस्थित मान्यवरांनी या कार्याचे विशेष कौतुक केले असून, भविष्यात हा उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.