पुणे-प्रतिनिधी । जामनेर येथील प्रफुल लोढाविरुद्ध बावधन पोलीस स्टेशनला ठाण्यातही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यामुळे प्रफुल लोढा पुन्हा गोत्यात आल्याचे मानले आहे.

संपूर्ण राज्यात प्रफुल्ल लोढा याची चर्चा सुरु आहे. अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस स्टेशनला प्रफुल लोढा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल असतांना त्याच्याविरुद्ध आता बावधन पोलीस स्टेशनला आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.
कोथरुड येथील 36 वर्षाच्या एका पिडीत महिलेने त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. संशयीत आरोपी प्रफुल लोढा याने फिर्यादी महिलेस तिच्या पतीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 27 मे 2025 रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास बालेवाडी येथील ऑर्किड हॉटेलमध्ये बोलवले. फिर्यादी महिलेस तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्याबदल्यात लोढा याने शरीरसंबंधाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
फिर्यादी महिलेने या प्रकाराला नकार दिला असता तुझी देखील नोकरी घालवतो असे म्हणत तिच्यासोबत बळजबरी शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप आहे. पिडीत महिलेने बावधन पोलीस स्टेशनला याप्रकरणी लोढा विरुद्ध बलात्काराची रितसर फिर्याद दाखल केली. या गुन्ह्याचा पुढील तपास महिला पीएसआय निलीमा जाधव करत आहेत. सध्या मुंबई पोलीसांच्या अटकेत असलेल्या लोढा याचा पुढील ताबा बावधन पोलिस घेणार आहेत.