मलकापूरमध्ये वाहन तपासणी दरम्यान कारमधून १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये जप्त

मलकापूरमध्ये वाहन तपासणी दरम्यान कारमधून १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये जप्त

मलकापूर  मलकापूर शहरातील बोदवड नाक्यावरील वानखडे पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी वाहन तपासणी दरम्यान पोलिसांनी एका चंदेरी रंगाच्या कारमधून १ कोटी ९७ लाख ५० हजार रुपये जप्त केले. या प्रकरणी पंचनामा करून वाहन आणि रक्कम ताब्यात घेण्यात आली असून, आयकर विभागाला माहिती देण्यात आली आहे. कारमधील दोन व्यक्तींची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत, आणि त्यांची चौकशी सुरू आहे.मलकापूर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक गणेश गिरी यांनी सांगितले की, मलकापूर-बुलढाणा रोडवरून चंदेरी रंगाच्या इरटिगा कारमधून (क्र. एमएच २० जीव्ही-१७८१) दोन व्यक्ती मोठ्या प्रमाणात रोख रक्कम घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार, बोदवड नाक्यावर वानखडे पेट्रोल पंपाजवळ वाहन तपासणी दरम्यान ही कार थांबवण्यात आली. तपासणीत कारच्या सिटखालील कप्प्यात रोख रक्कम आढळली. कारमधील दोघांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने वाहन पोलिस स्टेशनला आणण्यात आले. रक्कम आयकर विभागाच्या माहितीसह बुलढाणा जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे.दरम्यान, या कारवाईत पोलिसांनी कारमालकाची ओळख उघड न केल्याने त्यांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जात आहे. खबऱ्याच्या माहितीवरून तातडीने कारवाई करून रक्कम जप्त करण्यात आली,