जळगाव- प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील तीन महत्त्वाच्या उपविभागांना नवीन अधिकारी मिळाले आहेत. जळगाव शहर विभागाचे उपअधीक्षक संदीप गावित यांची भुसावळ उपविभागात बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जरी करण्यात आले आहेत.

प्रशासकीय कारणास्तव करण्यात आलेल्या या बदल्यांमध्ये राज्य पोलीस सेवेतील (रा.पो.से.) एकूण ६५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जळगाव शहरातून संदीप गावित यांची भुसावळ येथे बदली झाली असताना, जिल्ह्याला बाहेरून दोन नवीन उपअधीक्षक मिळाले आहेत.
विजयकुमार ठाकूरवाड यांची चाळीसगाव उपविभागाचे पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर, बापू रोहोम हे मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून जबाबदारी स्वीकारणार आहेत.