माजी नगरसेवक अनंत जोशी यांची आत्महत्या

जळगाव- प्रतिनिधी | माजी नगरसेवक तथा जागरूक समाजसेवक अनंत उर्फ बंटी जोशी यांनी आज गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अंत केल्याची धक्कादायक घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

नगरसेवक अनंत उर्फ बंटी जोशी हे जळगाव महापालिकेतील अतिशय सक्रीय असे नगरसेवक म्हणून गणले जातात. त्यांनी दोन पंचवाषिकमध्ये आपल्या कामाची छाप उमटवली आहे. तसेच, अनेक आंदोलनांमध्ये त्यांचा पुढाकार असून एक डॅशींग लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ख्याती होती.

आज सायंकाळी अचानक त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. याचे वृत्त येताच परिसरात मोठी खळबळ उडाली. त्यांचे पार्थिव जिल्हा रूग्णालयात आणले असून त्ोथे त्यांचे आप्त, मित्रमंडळी तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मंडळी मोठ्या संख्येने जमली आहे.