एथर एनर्जीने सादर केली नविन स्कूटर : एका चार्ज मध्ये १६१ किलोमीटर धावणार !

पुणे -प्रतिनिधी | इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीला लक्षात घेऊन एथर एनर्जीने भारतात आपल्या लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर 450S चा नविन वेरिएंट लॉन्च केला आहे. या नव्या मॉडेलमध्ये 3.7 kWh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली असून, याची एक्स-शोरूम किंमत 1.46 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

नव्या बॅटरीमुळे या स्कूटरची रेंज आता 115 किमीवरून थेट 161 किमी (IDC प्रमाणित) झाली आहे. परफॉर्मन्सच्या दृष्टीने यात 5.4 kW ची इलेक्ट्रिक मोटर असून ती 22 Nm टॉर्क देते. हा स्कूटर 0 ते 40 किमी प्रतितास वेग अवघ्या 3.9 सेकंदात पकडतो आणि त्याची टॉप स्पीड 90 किमी प्रतितास आहे.

ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार चालवता यावे म्हणून यामध्ये स्मार्ट इको, इको, राईड आणि स्पोर्ट असे चार राईड मोड उपलब्ध आहेत. डिजाईनच्या बाबतीत नव्या स्कूटरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. स्टँडर्ड 450S प्रमाणेच यामध्ये शार्प लुक आणि पुढे-पाठीमागे 12 इंचाचे चाके देण्यात आले आहेत.

स्कूटरमध्ये 7 इंचांची LCD स्क्रीन असून ती टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि एथरस्टॅक ओटीए अपडेट्सला सपोर्ट करते. सुरक्षेसाठी ऑटोहोल्ड, फॉल सेफ, इमर्जन्सी स्टॉप सिग्नल आणि अलेक्सा इंटिग्रेशनसारखी फीचर्सही आहेत. बॅटरीला होम चार्जरने 0 ते 80% चार्ज होण्यासाठी सुमारे 4.5 तास लागतात.

एथर एइट70 वारंटी पॅकेजसोबत ही स्कूटर येते, ज्यामध्ये बॅटरीवर 8 वर्षे किंवा 80 हजार किमीपर्यंतची वारंटी दिली जाते. बुकिंग सुरू असून डिलिव्हरी ऑगस्ट 2025 पासून केली जाईल. ग्राहक ऑनलाईन किंवा एथर स्टोअरमधून स्कूटर बुक करू शकतात.

इलेक्ट्रिक मोबिलिटी क्षेत्रात दमदार कामगिरी करणाऱ्या एथर एनर्जीच्या या नव्या मॉडेलमुळे ग्राहकांना अधिक श्रेयस रेंज आणि आधुनिक फीचर्सचा लाभ मिळणार आहे.