Missing youth from Savadya found dead यावल (30 ऑगस्ट 2025) : यावल तालुक्यातील बोरावल गावाच्या तापी नदीच्या पात्रात सावदा येथून बेपत्ता झालेल्या 38 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा तरुण 25 ऑगस्टपासून बेपत्ता होता. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

काय घडले तरुणासोबत
सावदा शहरातील साळीबाग भागातून अजय सुधाकर फाटके (38) हा तरुण 25 ऑगस्ट रोजी आपल्या घरी सांगून गेला होता की, मी फैजपूर येथे कापड दुकानात कामाला जात आहे मात्र नंतर तो बेपत्ता झाला. याप्रकरणी सावदा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार करण्यात आली होती. 26 ऑगस्ट रोजी दुचाकी दुचाकी भुसावळ जवळील तापी नदीच्या पुलावर आढळली व तरुणाने तापी नदीत उडी घेतल्याची चर्चा होती. त्यानंतर शोध सुरू असताना बुधवारी तरुणाचा मृतदेह बोरावल गावाजवळील तापी नदीकाठी आढळला.
याबाबत यावल पोलिसांना माहिती देण्यात आली. पंचनामा करून त्याचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. शवविच्व्छेदन केल्यानंतर मृतदेह मयताच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार उमेश सानप करीत आहे.