मुसळधार पावसात वीज कोसळली ; पाच मेंढ्यासह तरुणाचा मृत्यू ; रावेर तालुक्यात काय घडले ?

Young shepherd killed by lightning during heavy rains in Raver taluka रावेर (30 ऑगस्ट 2025) : रावेर तालुक्यात गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू असताना वीज कोसळून लालमाती चुनाबर्डी पाडा येथील 20 वर्षीय तरुण ठार झाला. दादाराव सोना कोळवे असे मयत मेंढपाळ तरुणाचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत ?
रावेर तालुक्यातील मुंजलवाडी येथील चुनाबर्डी शिवारात गुरुवारी रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या वेळी अंगावर वीज पडल्याने दादाराव सोना (सोनू) कोळपे (20, रा.लालमाती चुनाबर्डी पडा) हा मेंढपाळ ठार झाला तसेच तिघे गंभीर जखमी झाले व पाच मेढ्यांचा मृत्यू झाला.

वीज कोसळल्यानंतर कोळपे यास रावेर ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या घटनेत चांगदेव सोना कोळपे (27), सुपडू सोना कोळपे (20), मोहन काशीनाथ कोरडकर (20) हे जखमी झाले. त्यांच्यावर सुरू आहे. विजेच्या धक्क्याने मेढ्यांचाही मृत्यू झाला.