मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात चाललय काय ? शाळेसमोरच तरुणीला संपवले !

0th grade student was brutally murdered in front of her school. नागपूर (30 ऑगस्ट 2025) : नागपूरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहावीच्या विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या करण्यात आली. आरोपीदेखील अल्पवयीनच असून हत्या केल्यानंतर तो घटनास्थळावरून पसारर झाला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. अँजेल जॉन (कौशल्यायन नगर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे.

काय घडले नागपूरात ?
गणेशोत्सवानिमित्त नागपुरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त असताना एका दहावीतील विद्यार्थिनीची अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अजनी रेल्वे कॉलनीतील सेंट अँथोनी शाळेजवळ हत्या करण्यात आली. अँजेल ही सेंट अँथोनी शाळेमध्ये दहावीत शिकत होती तर अल्पवयीन आरोपी हा रामबाग परिसरातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी सव्वा दोन वाजताच्या सुमारास शाळा सुटली. त्यानंतर अँजेल तिच्या मैत्रिणींसोबत घरी जाण्यासाठी निघाली. शाळेतून बाहेर निघाल्यावर काही मीटर अंतरावरच अल्पवयीन आरोपी तिची प्रतीक्षा करत होता. त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्याला टाळून ती पुढे जाऊ लागली.

दुचाकीवरून आलेल्या आरोपीने तिला पकडले व खिशातून चाकू काढून तिच्या छातीवर वार केले. त्याने खोलवर घाव केल्याने मुलगी जोरजोरात ओरडत खाली पडली. आरोपीने तिच्यावर वार सुरूच ठेवले. त्यानंतर दुचाकी तेथेच सोडून तो अजनी रेल्वे कॉलनीतील हॉकी मैदानाच्या दिशेने पळत जात पसार झाला.

घटनास्थळी सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त रश्मिता राव, सहायक आयुक्त नरेंद्र हिवरे पोहोचले. अजनी पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.