दहिगावातील खून प्रकरणात आरोपीच्या वडिलांची दबंगगिरी : मृताच्या कुटूंबास दिली धमकी

Dahigaon murder case: Threats to the family of the deceased youth यावल (2 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील दहिगाव येथील 21 वर्षीय तरुणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या दोघांसह अजुन दोन जणांचा यात सहभाग असण्याचा पोलिसांना संशय आहे. एक संशयीत शहरातीलच असून त्या दृष्टीने पोलिस तपास करीत आहे. सोमवारी या गुन्ह्यातील एका संशयीताच्या वडीलाने मयत तरूणाच्या कुटुंबीस शिविगाळ करून धमकी दिल्याबाबत तक्रार नोंदवण्यात आली. वंचित बहुजन कडून पोलिसाकडे या गुन्ह्याचा सखोल तपासाची मागणी केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण ?
दहिगाव, ता.यावल या गावातील सुरेश आबा नगरातील रहिवासी इम्रान युनूस पटेल वय 21 (मुळ रहिवासी हनुमंतखेडा, ता.धरणगाव) या तरुणाची शुक्रवारी रात्री ज्ञानेश्वर गजानन पाटील (19) व गजानन रवींद्र कोळी (19, दोन्ही रा.सुरेश आबा नगर, दहिगाव) या तरुणांनी कोयत्याने वार करीत हत्या केली.

या गुन्ह्यात दोघांना अटक करण्यात आली असून या संशयीतांसह अल्पवयीन व यावल शहरातील एका तरुणाचा सहभाग असल्याचा पोलिसांना तपास अंती संशय आहे. या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या दोघां संशयीतांना शहरातील सराफा दुकानात सोन्याची अंगठी देखील मोड म्हणुन देवून काही खरेदी देखील केली होती व नंतर शहरातील एका तरुणासह ते एका हॉटेलात देखील गेल्याची माहिती आहे. संपूर्ण प्रकरणाची पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, सहा.पोलिस निरीक्षक अजय वाढवे, पोलिस उपनिरीक्षक अनिल महाजन तपास करीत आहे.

सखोल तपासाची ‘वंचित’ कडून मागणी
यावल पोलिस ठाण्यात वंचित बहुजन अघाडीच्या जिल्हाध्यक्ष शामिभा पाटील या दहिगाव येथील महिला व वंचितचे पदाधिकारी यांच्यासह पोलिस ठाण्यात धडकल्या होत्या. त्यांनी पोलिसांना गावातील मयत यांच्या कुटुंबास सरक्षण पुरवणे तसेच या गुन्ह्याचा सखोल तपास करीत यात अजून कोणी सहभागी आहे का तपासणे व दोषींना कठोर शासन करण्याची मागणी केली.

मयत तरुणांच्या कुटुंबास धमकी, पोलिसात तक्रार
मयत तरूणाच्या कुटुंबास हल्लेखोर गजानन कोळी याचे वडील रवींद्र पंढरीनाथ कोळी यांनी शिवीगाळ करून धमकी दिली. या प्रकरणी त्यांच्या वरूध्द यावल पोलिसात अदखल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला.