Unruly vehicle owners in Bhusawal ‘on the radar of the city traffic department’; Action taken against 52 vehicle owners in 48 hours भुसावळ (3 सप्टेंबर 2025) : भुसावळात बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक गंभीर बनल्याने नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत यांनी शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहर वाहतूक शाखेला सूचना केल्या आहेत.

48 तासात 52 वाहनांवर कारवाई
भुसावळ शहरातील वाढत्या बेशिस्त वाहतुकीला आळा घालण्यासाठी वाहतूक शाखेने शुक्रवारी सायंकाळी कारवाईची मोहित घेत जामनेर रोडवरील बाजारपेठ पोलिस ठाण्यापासून ते नाहाटा चौफुलीपर्यंत 18 दुचाकी, 3 रिक्षा, 7 हातगाड्या आणि दोन चारचाकी वाहन मालक अशा 30 जणांना दंड केला.
शनिवारी सुद्धा 22 जणांवर कारवाई झाली. वाहन धारकांकडून रस्त्याच्या कडेने किंवा थेट रस्त्यात वाहने उभी करून नियम पायदळी तुडवले जातात. याचा त्रास इतर वाहन चालक, पादचार्यांना होतो. सणासुदीच्या दिवसात शहरात कोंडी होते. याबाबत दिव्य मराठीने शुक्रवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत वाहतूक शाखेचे सहायक निरीक्षक उमेश महाले यांनी स्वत: जामनेर रोडवर कारवाईची मोहीम उघडली.
कारवाईदरम्यान केवळ मोटारसायकली, रिक्षा, कारच नव्हे तर थेट हातगाड्या लावून दुकाने थाटणार्यांवर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई दररोज सुरू राहणार असल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली. दरम्यान, कारवाई सुरू असल्याचे पाहून अनेकांनी रस्त्यावर लावलेल्या हातगाड्या, वाहने बाजूला केली. कारवाईमुळे बेशिस्तीवर काहीसा परिणाम झाला.