पंतप्रधान मोदींच्या पायाखालची वाळू सरकली ; मध्यावती निवडणुका होणार ; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा दावा

The sand has shifted under Prime Minister Modi’s feet; mid-term elections will be held; claims Congress state president Harshvardhan Sapkal नागपूर (3 सप्टेंबर 2025)  : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूरात एक महत्त्वपूर्ण दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पायाखालची वाळू सरकली असून देशात कोणत्याही क्षणी मध्यावधी निवडणुका लागतील, असे सपकाळ म्हणाले आहेत.

देशातील लोकशाही आणि संविधानाला भाजपमुळे धोका निर्माण झाला असून भाजपने मतांची चोरी करून सत्ता मिळवली आहे, असा आरोप करत काँग्रेसने आज नागपुरात ‘वोट चोर, गद्दी छोड’ असा भव्य मेळावा घेतला. यावेळी बोलताना सपकाळ यांनी दावा केला.

‘लोकशाहीला हात लावणार्‍या भाजप सरकारला हा एक इशारा आहे. ज्या नागपूरमधून 75 वर्षांच्या नेत्यांना खुर्ची खाली करण्याचे आदेश निघाले आहेत त्यामुळे मोदींच्या पायाखालची वाळू सरकली आहे. तो दिवस दूर नाही, जेव्हा देशात मध्यावधी निवडणुका होतील आणि शिव, शाहू, फुले व आंबेडकरांच्या विचारांचे नवे सरकार येईल,’ असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले आहेत.