Theft of livestock from Kanalda Shivar ; Farmers distressedजळगाव (5 सप्टेंबर 2025) : पशूधनाच्या चोर्यांमुळे शेतकरी त्रस्त असतानाच आता पुन्हा जळगाव तालुक्यातील कानळदा शिवारातून शेत गट क्रमांक 19 मधील एका शेतकर्याच्या गोठ्यातून 88 हजार रुपये किंमतीच्या 20 लहान-मोठ्या बकर्या चोरीला गेल्या. ही घटना 24 ऑगस्ट रोजी पहाटे सहा वाजता उघडकीस आली. या संदर्भात मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय नेमके आहे चोरीचे प्रकरण ?
मिलिंद गोकूळ कंखरे (27) यांच्या मालकीच्या या बकर्या होत्या. कंखरे यांनी आपल्या शेतातील गोट्यात या बकर्या पाळल्या होत्या. मात्र, चोरट्यांनी रात्रीच्या वेळी त्यांच्या गोट्यातून 20 लहान-मोठ्या बकर्या चोरून नेल्या. या घटनेमुळे कंखरे यांना सुमारे 88 हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. घटना उघडकीस आल्यानंतर कंखरे यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. प्राथमिक चौकशीनंतर अखेर मंगळवारी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार श्रीकांत बदर करीत आहे.