Youth dies after being crushed by dumper in Neri : Road blocked for two hours नेरी, ता.जामनेर (8 सप्टेंबर 2025) : भरधाव वेगातील डंपरने 30 वर्षीय चिरडल्याची घटना नेरीदिगर, ता.जामनेर येथे घडली. गजानन अरुण पाटील (रा. नेरी दिगर) असे मृताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. त्यानंतर शनिवारी सकाळी नेरी दिगर येथील ग्रामस्थांनी मृतदेह नेरी येथील चौफुलीवर आणत दोन तास ठिव्या आंदोलन केले.

काय घडले नेमके ?
नेरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ गजानन पाटील यांना भरधाव वेगातील डंपरने (के.ए.28 के.के.19185) ने चिरडले. हा डंपर आकाश भरत राजपूत चालवत होता. अपघातानंतर तो पसार झाला पोलिस व ग्रामस्थांनी पाठलाग करून त्याला वाकदडा येथून पकडले. घटनेनंतर शनिवारी सकाळी नेरीदिगर येथील ग्रामस्थांनी मृत गजानन पाटील यांच्या पार्थिवासह नेरी येथील चौफुलीका दोन तास ठिय्या आंदोलन केले.