Employees on immersion procession duty in Jalgaon : Thieves at the door! जळगाव (8 सप्टेंबर 2025) : जळगावात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. जळगाव महापालिकेतील कर्मचार्याचा फ्लॅट बंद असतानाचोरट्यांनी अपार्टमेंटमधील तिसर्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केले. याबाबत शहर पोलिसात तक्रार देण्यात आली.

काय घडले जळगावात ?
गणेश पवार हे महापालिका कर्मचारी आहेत. ते शनिवारी गणेश विसर्जनासाठी उभारलेल्या बूथवर कार्यरत होते तर त्यांची पत्नी रुचिता या जाऊ व मुले, पुतण्यासह मिरवणूक बघण्यासाठी दुपारी चार4 ते रात्री 10 दरम्यान गेल्या होत्या. घरी परत आल्यावर पवार दाम्पत्याला घराचे कुलूप तुटलेले दिसले. चोरट्यांनी बेडरूममधील कपाटाचे कुलूप तोडून त्यातील सामान फेकून दिले तर लॉकरचे कुलूप तोडून पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे सांगण्यात आले.