Relief for beloved sisters soon : August and September installments will arrive in the account this month! मुंबई (8 सप्टेंबर 2025) : लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता मिळाला नसल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण असताना या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा एकत्रीतरित्या देण्याचे नियोजन असून मंगळवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडक्या बहिणींमध्ये नाराजी
गणरायाचे विसर्जन झाले तरी महिलांना सणासुदीच्या काळात ऑगस्टचे पैसे मिळालेले नाहीत त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये नाराजी आहे. लाडकी बहिण योजनेचा हप्ता लांबणीवर गेला तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्याबाबत घोषणा केली जाते. दरम्यान, अजूनही ऑगस्टच्या हप्त्याबाबत घोषणा केलेली नाही. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या मनात संभ्रम निर्माण झाले आहेत. मात्र सप्टेंबर महिन्यात दोन हप्त्यांचे पैसे जमा केले जाणार असल्याचे संकेत मिळत असून, याबाबतची अधिकृत घोषणा मंत्री अदिती तटकरे लवकरच करणार असल्याचे समजते.
या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. प्रारंभी या योजनेत 2 कोटी 63 लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली होती. मात्र, पडताळणी झाल्यानंतर हा आकडा 2 कोटी 48 लाखांवर आला आहे.
अर्जाची पडताळणी सुरूच
आतापर्यंत 26 लाख लाभार्थी अपात्र ठरल्या आहेत. सरकारी कर्मचारी महिलांनी घेतलेला लाभ परत घेतला जाणार आहे. ज्या महिलांचे बँकेत खाते नव्हते त्यांनी घरातील पुरुषांचे खाते दिले का याची पडताळणी सुरू असल्याचे तटकरे म्हणाल्या.