नेपाळमध्ये गृहमंत्र्यांचा राजीनामा : निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू

काठमांडूमध्ये कर्फ्यू : दिसताच क्षणी गोळीबार करण्याचे आदेश

Home Minister resigns in Nepal: 20 people die in protests, काठमांडू वृत्तसेवा (8 सप्टेंबर 2025) : नेपाळचे गृहमंत्री रमेश लेखक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर खळबळ उडाली असून देशात सुरू असलेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर काठमांडू येथे कर्फ्यू लावण्यात आला आहे. निदर्शनात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू
राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला तर 400 हून अधिक जखमी झाले आहेत. भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधात मोठ्या संख्येने जनरेशन-झेड (18 ते 28 वर्षे) निदर्शने करत आहेत.

सोमवारी सकाळी 12 हजारांहून अधिक निदर्शक संसद भवन संकुलात घुसले. त्यानंतर सुरक्षा दलांनी अनेक राउंड गोळीबार केला. काठमांडू प्रशासनाने तोडफोड करणार्‍यांवर दिसताच क्षणी गोळीबार करण्याचे आदेशही दिले.

संसद भवन, राष्ट्रपती भवन, उपराष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासस्थानाभोवती कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. दुसरीकडे, केपी ओली यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवण्यास स्पष्ट नकार दिला. यापूर्वी, काही माध्यमांनी दावा केला होता की, सरकारने या प्लॅटफॉर्मवरील बंदी उठवली आहे.