दारू दुकानदाराला शिविगाळ करीत रोकड लूटली : अवघ्या काही तासात बाजारपेठ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Robbery in wine shop : Accused arrested from Pune and Bhusawal cities भुसावळ (9 सप्टेंबर 2025) : मद्याच्या दुकानात मद्य घेवून पैसे न देता दुकानदाराला शिविगाळ, दमदाटी करीत दोन हजार दोनशे रुपये घेवून आरोपी पसार झाले होते. भुसावळ शहरात घडलेल्या या घटनेप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासात आरोपींना अटक करण्यात आली. रीतीक भगवान निदाने (25, वाल्मीक नगर, भुसावळ) व मिहीर दिलीप तायडे (25, केशव नगर, हडपसर, पुणे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

असे आहे लूट प्रकरण
भुसावळातील जामनेर रोडवर पंकज घनश्याम जंगले (जळगाव) यांचे मधुर वाईन शॉप आहे. 7 रोजी रात्री पावणेनऊ वाजता दोन्ही संशयीत आल्यानंतर त्यांनी दोन दारूच्या बाटल्या विकत घेतल्या व पैसे मागितल्यानंतर शिविगाळ करीत दमदाटी केली व काउंटरवरील दोन हजार दोनशे रुपये हिसकावून पोबारा केला. 8 रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर बाजारपेठ पोलिसांनी सीसीटीव्ही आधारे आरोपी निष्पन्न करीत त्यांना बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून 780 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, पोलिस उपअधीक्षक संदीप गावीत , बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, हवालदार विजय पोहेकर, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल महेंद्र पाटील, कॉन्स्टेबल अमर आढाळे, कॉन्स्टेबल भूषण चौधरी, हवालदार रवींद्र भावसार, प्रशांत सोनार आदींच्या पथकाने केली.