A speeding truck suddenly changed lanes near Wakod and hit a car : MP woman dies पहूर (9 सप्टेंबर 2025) : भरधाव ट्रकने अचानक लेन बदलल्याने मागून येणारी इको कार धडकून झालेल्या अपघातात मध्य प्रदेशातील सियानीबाई रेत्या बारेला (केलारिया बडवानी, मध्यप्रेदश) या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पहूर पोलिसात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

असा घडला अपघात?
लखन हुकमचंद मालवीय हे 6 सप्टेंबर रोजी रात्री 10.30 वाजता आपली मारुती सुझुकी इको (एम.एच.09 झेड.एम.8360) घेऊन जात असताना ट्रक (एम.एच.18 बी.जी.6666) घेवून चालक सईद खान खानन्याज खान जात असताना चालकाने ट्रक हलगर्जीपणाने आणि भरधाव वेगाने चालवत अचानक डावीकडून उजवीकडे लेन बदलली व त्याचवेळी लखन मालवीय यांच्या कारचा ट्रकच्या मागील बाजूस धक्का लागून त्यांची गाडी रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळली.
जखमींना रुग्णालयात दाखल
या अपघातात इको कारचे मोठे नुकसान झाले. गाडीत बसलेल्या प्रदीप बारेला, मुक्तीलाल ब्राम्हणे, मगन बारेला, राजिया बारेला, आणि राम मालवीय यांना गंभीर दुखापत झाली तर सियानीबाई रेत्या बारेला यांना प्राण गमवावे लागले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला. या प्रकरणाचा तपास सहा.पोलीस निरीक्षक प्रमोद कटारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार प्रकाश पाटील हे करीत आहे.