Muslim-Navi community members protest the murder of a child in Yaval city यावल (10 सप्टेंबर 2025) : शहरातील मुस्लिम खलिफा-न्हावी समाज बांधवांच्या वतीने बुधवार, 10 सप्टेंबर रोजी तहसील कार्यालय व यावल पोलिसात निवेदन देण्यात आले. शहरातील बाबूजी पुरा भागात सलून व्यवसाय करणार्या तरुणाने बालकाची निर्घृण हत्या केल्याने या घटरनेचा तीव्र निषेध करण्यात आला व आरोपी तरुणाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

पाच वर्षीय बालकाची हत्या
शहरातील बाबूजीपुरा भागात एका पाच वर्षीय बालकाची सलून व्यावसायीक असलेल्या शेख शाहिद शेख बिस्मिल्ला न्हावी (22) या तरुणाने निर्घृण हत्या केली होती. या घटनेच्या निषेधार्थ यावल शहरातील मुस्लिम खलिफा न्हावी बांधवांनी एकत्र येत माजी उपनगराध्यक्ष रफीयोद्दीन अब्दुल हमीद यांच्या नेतृत्वात पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन व तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदन दिले.
निवेदनाचा आशय असा की, बाबूजीपुरा भागात राहणार्या बालकाची हत्या करणार्या शेख शाहिदवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्याचे कृत्य हे अमानवीय कृत्य आहे, त्याचे कोणीच समर्थन करणार नाही. जलद न्यायालयात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देते प्रसंगी मो.रफीक, शेख मोईयोद्दीन, मो.साबीर, शेख सलीम खलीफा, गुलाम रजा खलीफा, शेख इमरान खलीफा सह मुस्लिम खलिफा न्हावी बांधव उपस्थित होते.