एस.टी.चालकाचे प्रसंगावधान अन् बचावले प्रवासी

Accident averted due to driver’s alertness on Yaval-Haripura bus यावल (10 सप्टेंबर 2025) :  यावल एसटी आगाराची यावल-हरीपुरा मार्गावरील एस.टी. बस (क्रमांक एम.एच. 20 बी.एल.1596) गावाजवळ अपघातग्रस्त झाली. हा अपघात बुधवारी दुपारी घडला, बस चालक डी.बी.धनगर यांनी प्रसंगवधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली.

सुदैवाने टळला अपघात
यावलकडून हरिपुरा येथे बस जात असतांना पाऊस सुरू झाला यात शहराबाहेर कृषी कार्यालय समोर रस्त्यावर पडलेल्या चिकट मातीमुळे बस अनियंत्रीत होत होती चालकाने प्रसंगवधान राखत गती कमी करीत बसवर पुन्हा नियंत्रण मिळवले. बस रस्त्याच्या कडेला दरीलगत उतरली होती. यात प्रवाशांना कुठलीचही दुखापत झाली नाही तसेच लागलीचं बस तेथुन काढून पुढे मार्गस्त करण्यात आली.