श्री क्षेत्र मनुदेवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त तयारीला वेग ; दुकानदारांची आढावा बैठक

Shopkeepers’ review meeting on the occasion of Navratri festival at Shri Kshetra Manudevi Temple यावल (10 सप्टेंबर 2025) : शारदीय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशनच्या वतीने वर्ष प्रथम आढावा बैठक घेण्यात आली. यात अध्यक्षस्थानी विश्वदीप पाटील यांनी सर्व दुकानदारांना नियम लावून भाविकांची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.

यात्रोत्सवानिमित्त नियोजन बैठक
आडगाव, ता.यावल येथून जवळच सातपुड्याच्या कुशीत श्री क्षेत्र आई मनुदेवी मंदिर आहे. येथे आगामी शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात असलेल्या व्यावसायीकांच्या श्री सनातनी मनुदेवी दुकानदार असोसिएशनच्या वतीने बुधवारी वर्ष प्रथम आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी विश्वदीप पाटील होते. त्यांनी प्रसंगी दुकानदारांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, उत्सवादरम्यान परिसरात कुठेही अस्वच्छता निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी.

रहदारीस अडचण निर्माण न करण्याचे आवाहन
यात्रोत्सवासाठी सर्व दुकानदारांनी आपापली दुकाने थाटतांना रहदारीस अडचण होणार नाही या बाबत दक्षता घ्यावी, मंदिर परिसरातील दीपमाळा असेल मंदिर परिसरातील पाण्याची ठिकाणे असतील या पूर्ण परिसरात स्वच्छता अभियान राबवत येथे स्वच्छता करण्याचा निर्णय घेण्यात आला.

बैठकीत संघटनेचे उपाध्यक्ष योगेश पाटील, सचिव कैलास पाटील, खजिनदार गोपाळ पाटील, वामन पाटील, अमोल पाटील, जीवन वाणी, सिकंदर तडवी सह सर्व दुकानदार उपस्थित होते.