Young farmer from Amalner commits suicide due to debt अमळनेर (11 सप्टेंबर 2025) : कर्ज डोईजड झाल्याने 36 वर्षीय तरुणाने विहिरीत उडी घेवून आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आली. समाधान विजय पाटील (36, लोणखुर्द, ता.अमळनेर) असे मयताचे नाव आहे.

काय घडले तरुणासोबत ?
अमळनेर तालुक्यातील लोणखुर्द गावात समाधान पाटील हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. मंगळवार, 9 सप्टेंबर रोजी सकाळी ते घरातून निघून गेले. समाधान पाटील हे घरी दिसत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी गावामध्ये त्यांचा शोध घेतला. मात्र ते कुठेच आढळले नाहीत. त्यानंतर, त्यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे दुपारी तीन वाजता समोर आले. मिळालेल्या माहितीनुसार, समाधान पाटील यांच्यावर मोठे कर्ज होते आणि याच कारणामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक सुनील राजाराम पाटील हे करीत आहे.