Women from Raver taluka defamed through fake accounts on Instagram रावेर (11 सप्टेंबर 2025) : रावेर तालुक्यातील एका गावातील महिलांच्या छायाचित्रांचा वापर करीत त्यापुढे एका गावातील पुरूषांचे छायाचित्र लावून सोशल मिडीयावर अश्लील कमेंट टाकून बदनामी करण्यात आली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात सावदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.

अश्लील मजकूर टाकून बदनामी
तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, तिच्यासह इतर महिलांचे वैयक्तिक फोटो खाजगीपणे वापरून, त्याचबरोबर एका गावातील काही पुरुषांचे फोटो त्यास जोडण्यात आले व अश्लील व मानहानीकारक कमेंट्स सोशल मीडियावर करण्यात आल्या. हे सर्व फोटो व मजकूर बनावट इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आल्या.
अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास बोदवड पोलिस निरीक्षक अरविंद भोळे करीत आहेत.
पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित खोटे इंस्टाग्राम खाते बंद करण्यात आले. लवकरच आरोपीला शोधून कडक कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.