जळगावातील सुवर्णबाजारात सोन्याच्या दराने फोडला घाम

Gold prices skyrocket जळगाव (11 सप्टेंबर 2025) : जळगाव सुवर्णबाजारात सोन्याच्या चांदीच्या किमतीने नवीन ऐतिहासिक उच्चांक गाठला. 24 कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति 10 ग्रॅम एक लाख 12 हजाराच्या वर पोहोचला तर चांदीचा दर एक लाख 28 हजारापर्यंत गेला. ऐन दसरा, दिवाळी तोंडावर दोन्ही मौल्यवान धातूंचे दर वाढल्याने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

गुरुवारी सोन्याचा आणि चांदीच्या दरात मोठे बदल दिसत आहे. गुरुवारी सकाळच्या सत्रात सोन्यासह चांदी दरात किंचित घसरण दिसतेय. मागच्या तीन दिवसात जळगावच्या सराफ बाजारात सोने दरात प्रति तोळा तीन हजारापर्यंत वाढ झाली तर चांदी दर तब्बल चार हजारापर्यंत वाढला.

भारतातील सोन्याच्या भावावर परिणाम करणारे अनेक घटक आहेत, ज्यात जागतिक बाजारपेठेतील चढउतारांपासून ते अमेरिकन डॉलरची ताकद, आयात खर्च, बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर, आर्थिक स्थिरता, हंगामी किमती, महागाई आणि मागणी-पुरवठा इत्यादींचा समावेश आहे. उच्च चलनवाढीचा दर सोन्याची मागणी वाढवतो आणि उलट, मागणी वाढल्याने त्याची किंमत देखील वाढते.

काही जागतिक परिस्थितींव्यतिरिक्त, सोन्याची आंतरराष्ट्रीय स्पॉट किंमत भारतातील सोन्याच्या धातूच्या किमतीवर देखील परिणाम करते. इतर कोणत्याही उत्पादनाप्रमाणे, मागणी आणि पुरवठा देखील सोन्याच्या भावावर परिणाम करते. सोन्याची मागणी आणि पुरवठा वाढल्याने त्याच्या किमती देखील वाढल्या आहेत.