Daring burglary in Hudco Colony, Bhusawal: Property worth lakhs looted भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : शहरातील हुडको कॉलनी, अयोध्या नगर परिसरात चोरट्यांनी बंद घराला टार्गेट करीत 65 हजारांच्या रोकडसह 13 ग्रॅमचे दागिने मिळून सुमारे 95 हजारांचा ऐवजलांबवला. सातत्याने सुरू असलेल्या घरफोड्यांमुळे रहिवासी धास्तावले आहेत.

काय घडले हुडको कॉलनीत ?
सेवानिवृत्त कर्मचारी अनोशकुमार रजनीकांत सालवे (68, हुडको कॉलनी, अयोध्या नगर, भुसावळ) हे 7 ते 10 सप्टेंबरदरम्यान चोपडा येथे गेल्यानंतर घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली.
अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत कपाटातील 65 हजारांची रोकड तसेच 28 हजार रुपये किंमतीचा 12.120 ग्रॅमचा नेकलेस, तीन हजार रुपये किंमतीचा 1.100 ग्रॅम वजनाचा सोन्याचा टॉप्स मिळून एकूण 95 हजारांचा ऐवज लांबवला आहे.
सालवे हे घरी आल्यानंतर घरफोडी लक्षात आली व शहर पोलिसांना माहिती कळवताच त्यांनी धाव घेतली. पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी सांगितले की परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून चोरट्यांचा माग काढण्याचे काम सुरू आहे. हुडको कॉलनीत घडलेल्या या घरफोडीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.