जळगाव ग्राहक आयोगात लोकअदालत : 42 प्रकरणे सामंजस्याने निकाली

Compromise in 42 cases in Lok Adalat in Jalgaon: Recovery of one crore 44 lakhs जळगाव (15 सप्टेंबर 2025) : जळगाव जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगात 13 रोजी आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत 144 पैकी 42 प्रकरणे आपसात सामंजस्याने मिटवण्यात आली व एक कोटी 44 लाख चौर्‍यांशी हजार पाचशे एक्कावन्न रुपयांची वसुली करून ती रक्कम ग्राहकांना अदा करण्यात आली. तडजो करण्यात आलेल्या ग्राहकांमध्ये बहुतांश नागरिक व महिलांचा सहभाग होता.

आपसात झाली तडजोड
26/2025 प्रकरणात प्रसाद शिंदे विरूध्द मे. विंध्या इंजिनीअरींग प्रा.लि. या प्रकरणात अ‍ॅड.आदेश वैद्य व संबंधीत कंपनीचे प्रतिनीधी यांच्या प्रयत्नाने प्रकरण आपसात रक्कम 38 लाख 50 हजारात मिटविण्यात आले.

247/2022 प्रकरणात पिंकी सींग विरूध्द बजाज अलायन्स प्रा.लि. या प्रकरणात ग्राहक व संबंधीत कंपनीचे प्रतिनीधी व अ‍ॅड.राठी यांच्या प्रयत्नाने सदरचे प्रकरण रक्कम 24 लाखात आपसात मिटविण्यात आले.

बर्‍याच प्रकरणांमध्ये विमा कंपन्या, बँका, पतसंस्था व महावितरण कंपनी इत्यादींनी प्रकरणे आपसांत तडजोडीने मिटवण्यात आली

राष्ट्रीय लोकअदालतीचे पॅनल प्रमुख म्हणून छाया सपके, पॅनल सदस्या संजय माणिक यांनी कामकाज पाहिीले. लोक अदालत यशस्वीतेसाठी वकील संघातील सर्व वकील बांधव व पक्षकार (ग्राहक) उपस्थित होते. लोक-अदालतीसाठी आयोगातील कर्मचारी हिरालाल देशमुख, मिलिंद गाढे, एस.एस.परदेशी, पैरवी हकिम शेख, एल.पी. सी. नेहा पाटील, रोशन वाघ व रीपक लोखंडे यांनी विशेष परिश्रम घेतले.