Minor girl molested on bike यावल (15 सप्टेंबर 2025) : यावल तालुक्यातील एका गावातील 9 वर्षीय बालिकेचा एका 50 वर्षीय इसमाने विनयभंग केला. ही घटना धानोरा ते चिंचोली या दरम्यान चालत्या दुचाकीवर घडली. संशयीताला माणुसकी म्हणून बालिकेच्या वडीलांनीच सायंकाळची वेळ असल्याने धानोरा येथून दुचाकीवर बसवून गावात आणतांना हा प्रकार घडला. या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करून इसमास अटक करण्यात आली.

काय आहे नेमके प्रकरण ?
यावल तालुक्यातील एका गावातील पिता त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींसह शनिवारी सांयकाळी धानोरा, ता.चोपडा येथे गेला होता व तेथून परतत असताना दुचाकीवर त्याच्या दोन अल्पवयीन मुली यात एक पुढे व नऊ वर्षीय मुलगी मागे बसली होती.
सायंकाळची वेळ असल्याने त्यांना धानोरा येथे नंदराज रतन मोरे (50) हा इसम भेटला व त्यास चिंचोली येण्याकरीता वाहन मिळणार नाही म्हणून माणुसकीच्या नाते बालिकेच्या वडीलांनी त्यास दुचाकीवर लिप्ट दिली व तो 9 वर्षीय बालिकेच्या मागे बसला असता धानोरा ते चिंचोलीदरम्यान त्याने 9 वर्षीय बालिकेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करीत तिचा विनयभंग केला.
घडलेला प्रकार मुलीने घरी तिच्या आई-वडील व काकास सांगितला. या प्रकरणी यावल पोलिसात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक एम.जे.शेख, हवालदार वासुदेव मराठे करीत आहे.