शेती साहित्य चोरणार्‍या दोन सराईत गुन्हेगारांसह दहा चोरट्यांना निंभोरा पोलिसांकडून बेड्या

Nimbhora police arrest ten thieves, including two criminals who stole agricultural equipment निंभोरा, ता.रावेर (15 सप्टेंबर 2025) : निंभोरा पोलिस ठाण्याचे डॅशिंग सहाय्यक निरीक्षक हरिदास बोचरे व त्यांच्या टीमने शेती साहित्य चोरणार्‍या दहा चोरट्यांना बेड्या ठोकत त्यांच्याकडून तब्बल 12 लाखांचे साहित्य जप्त केले तसेच एकूण 10 गुन्हे उघडकीस आणले आहेत.

पोलीसांनी लावला गुन्हेगारांचा छडा
निंभोरा हद्दीतील चोर्‍यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी झडती सत्र राबवले तसेच एका चोरट्याची माहिती मिळताच तेथे छापेमारी करून साहित्य जप्त करण्यात आले मात्र संशयीत पसार झाला मात्र संशयीत महिला योगीता कोळी गवसली व पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणारा मुख्य सूत्रधार स्वप्नील वासुदेव चौधरी याला ताब्यात घेतले. त्याच्या घराची आणि गोदामाची झडती घेतली असता तेथे चोरी केलेल्या साहित्याचा साठा सापडला.

10 गुन्ह्यांमध्ये सात आरोपी अटकेत
या प्रकरणी चोरी करणारा मुख्य आरोपी विलास ऊर्फ काल्या सुपडू वाघोदे हा पसार असला तरी पोलिसांनी योगिता सुनील कोळी, गोपाल संजय भोलनकर, आकाश मधुकर घोटकर, अर्जुन रतनसिंग सोळंकी, तसेच चोरीचा माल ठेवणार्‍या जमील अब्दुल तडवी आणि विकत घेणार्‍या स्वप्नील वासुदेव चौधरी, राकेश सुभान तडवी, ललित सुनील पाटील आणि राहुल ऊर्फ मयूर अनिल पाटील या 10 आरोपींना अटक केली आहे.

या आरोपींकडून शेतीचे साहित्य, 5 टी.पी. पंप, 11 मोठ्या बॅटर्‍या, 3 लहान बॅटर्‍या, 7 इन्व्हर्टर, 4 मोटारसायकल, 2 पॉवर ट्रॅक्टर, 1 नॅनो कार, 2 सोलार प्लेट, 11 मटेरियल बॅग आणि 3 ठिबक नळ्यांचे बंडल असा एकूण 12 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामुळे निंभोरा, यावल, रावेर, मुक्ताईनगर आणि सावदा पोलीस स्टेशनमधील एकूण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलीस दलाचे कौतुक
पोलीस अधीक्षक डॉ. महेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली निंभोरा पोलीस स्टेशनचे एपीआय हरिदास बोचरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील, ममता तडवी, सुरेश अढायंगे, बिजु जावरे, रिजवान पिंजारी, अविनाश पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सोपान गोरे यांच्यासह इतर पोलिस कर्मचार्‍यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. निंभोराच्या पोलिसांच्या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.