Approval to fill 15 thousand posts in the state police force ; Relief given regarding age limit! मुंबई (16 सप्टेंबर 2025) : राज्य सरकारने पोलीस भरतीची तयारी करणार्या तरुणांसाठी मोठी खूष खबर दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस दलातील शिपाई पदासाठी जवळपास 15 हजार पदे भरण्यास मंजुरी मिळाली.

या भरतीची विशेषतः अशी आहे की, या भरतीमध्ये सन 2022 पासून 2025 पर्यंत संबंधित पदाची विहित वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना आणखी एक वेळची संधी देण्यात येत आली तसेच या उमेदवारांना भरती प्रक्रियेसात सहभागी होता येणार आहे. याबाबतचा शासन निर्णय 10 सप्टेंबर 2025 रोजी गृह विभागाकडून जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, भरतीची तयारी करणार्या आणि वयोमर्यादा संपुष्टात आलेल्या उमेदवारांना ही उत्तम संधी चालून आली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत राज्य पोलीस दलात रिक्त असलेल्या व रिक्त होणार्या पदांचा आढावा घेण्यात आला. यात 2024 दरम्यान रिक्त असलेली आणि 2025 मध्ये रिक्त होणार्या 15 हजार पदांचा समावेश आहे. यात विविध पाच प्रकारच्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेत ज्यांची वयोमर्यदा संपली होती सन 2022 ते 2025 पर्यंतच्या सर्व उमेदवारांना फॉर्म भरता येणार आहे. या सुवर्णसंधीचा सर्वच उमेदवारांना लाभ घेता येईल. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाकडून याबाबतचे शुद्धिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही चागंली संधी आहे. दरम्यान, गेल्या 2-3 वर्षांपासून पोलीस भरती रखडली होती. त्यामुळे, विद्यार्थ्यांसह विविध संघटनांकडून भरतीची मागणी केली जात होती. अखेर, भरती प्रक्रिया सुरू झाली असून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही शासनाने संधी देऊ केली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई तसेच कारागृह विभागातील कारागृह शिपाई संवर्गातील 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत रिक्त झालेली आणि 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025 या कालावधीत रिक्त होणारी एकूण 15 हजार 631 पपदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.
शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक नुसार सन 2022 व सन 2023 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे. मात्र, शासनाच्या नव्या शुद्धपत्रकानुसार, सन 2022, 2023, 2024 व 2025 मध्ये संबंधित पदाची विहित कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून प्रस्तुत भरती प्रक्रियेकरीता आवेदन अर्ज सादर करण्यास पात्र ठरविण्यात येत आहे., असे आदेशच शासनाने दिले आहेत. त्यामुळे, 2022 ते 2025 या 4 वर्षांच्या कालावधीतील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी मिळणार आहे.
या पदांची होणार भरती
पोलीस शिपाई- 10 हजार 908.
पोलीस शिपाई चालक- 234
बॅण्डस् मॅन- 25
सशस्त्र पोलीस शिपाई – 2,393
कारागृह शिपाई – 554