दोन महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ ; सिनीयर आयपीएस अधिकारी निलंबित

वृत्तसेवा । चेन्नई (16 सप्टेंबर 2025) : दोन महिला कॉन्स्टेबलचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी डी.महेश कुमार यांना निलंबित करण्यात आले. ते तामिळनाडूचे सहआयुक्त असून त्यांच्याकडे उत्तर चेन्नईच्या वाहतूक विभागाचा पदभार होता. याच विभागात काम करणार्‍या दोन महिला कर्मचार्‍याकडे डी.महेश कुमार शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप आहे.

अश्लील चॅट अन् बरंच काही
डी.महेश कुमार हे वारंवार अश्लील चॅट आणि व्हिडीओ कॉल करून महिला कर्मचार्‍यांना त्रास देत होते. अखेर दोन्ही महिलांनी डी महेश कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

पोलिस कॉन्स्टेबलकडून लैंगिक छळाच्या अनेक तक्रारींना तोंड देणार्‍या आयपीएस अधिकार्‍याविरुद्धच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आता तामिळनाडू पोलीस विभागाने डीजीपी सीमा अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली विशाखा समितीची स्थापना केली. तपासानंतर आता महेश कुमार यांना आता निलंबित करण्यात आले आहे.

सूत्रांच्या मते, महेश कुमार यांच्याविरुद्ध दोन महिला कॉन्स्टेबलनी डीजीपी शंकर जिवाल यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. यानंतर हे प्रकरण आयसीसी अर्थात इंटर्नल कंम्प्लेंट कमिटीकडे पाठवण्यात आलं. पीडित महिलांनी तक्रारीसोबत डी.महेश कुमार यांनी केलेल्या अश्लील चॅटचे स्क्रीनशॉट्स पुरावे म्हणून सादर केले

आयसीसीच्या प्राथमिक चौकशीनंतर, महेश कुमार यांना आता गृह विभागाने निलंबित केले. डी .हेश कुमार हे डिसेंबर 2024 पर्यंत वाहतूक विभागात चेन्नई दक्षिणचे सह पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर त्यांची बदली चेन्नई उत्तरमध्ये करण्यात आली होती.