ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैरव्यवहार : संचालक अर्चना कुटेला बेड्या

Financial irregularities of Gyanradha Patsanstha: Director Archana Kut is arrested बीड (16 सप्टेंबर 2025) : ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात तिरूमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यामधून अटक करण्यात आली. सीआयडीच्या संभाजीनगर पथकाने ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे

ज्ञानराधा पतसंस्थेच्या साडेतीन हजार कोटी त्या घोटाळा प्रकरणात सुरेश कुटे व इतर आरोपी अटक आहेत. त्यानंतर अर्चना कुटे यांना झालेली अटक महत्त्वाची समजली जात आहे.

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील 2,467 कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचलनालयाने 188 कोटी 41 लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टाच आणली. आतापर्यंत टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये कुटे ग्रुपच्या कंपन्यांशी संबधित जमीन, इमारत, प्लांट, यंत्र आदींचा समावेश आहे. या मालमत्ता बीड जिल्ह्यात असल्यााची माहिती ईडीकडून देण्यात आली. आतापर्यंत 1621 कोटी 89 लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.